मनोगत

माझ्या प्रिय ग्रामस्थांनो,

आपली ग्रामपंचायत सकवार ही पेसा ग्रामपंचायत असून, येथे अधिक लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. मी स्वतःही आदिवासी समाजाचा घटक असून, या भूमीशी माझं नातं रक्तात आहे. मात्र, माझं नेतृत्व हे फक्त एका समाजापुरतं मर्यादित नाही — माझं ध्येय आहे सर्व समाजघटकांचा समतोल आणि सर्वांगीण विकास.

माझं कार्य हे सर्व ग्रामस्थांसाठी आहे. मग ते कोणत्याही समाजाचे, जातीचे, धर्माचे असोत. प्रत्येक व्यक्तीला सन्मान, संधी आणि सुविधा मिळावी, हेच माझं ध्येय आहे.

पेसा कायद्याने आपल्याला स्वशासनाचे अधिकार दिले आहेत. हे अधिकार केवळ कागदावर न राहता, गावाच्या निर्णय प्रक्रियेत लोकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामसभा हीच सर्वोच्च संस्था आहे, आणि तिच्या माध्यमातून आपण गावाचा विकास निश्चित करू शकतो.

गावाचा विकास हा सर्वांचा सहभाग, सर्वांचा विश्वास, आणि सर्वांचा लाभ यावर आधारित असावा हीच माझी भूमिका आणि वचन आहे.